पुणे – पर्वती जलकेंद्र, पंपिंग, रॉ वॉटर, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी. वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग येथील विद्युत, पंपिंगविषयक आणि स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम होणार असल्याने येत्या गुरुवारी (दि.6) उपनगरांसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
शुक्रवारी (दि.7) उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.