पोटनिवडणुकीसाठी सर्व उमेदवारांचे अर्ज पात्र

उद्या चिन्ह वाटप : 52 उमेदवारांनी केले होते अर्ज
पुणे –
नगरसेवकपदाच्या तीन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी सर्वच्या सर्व 52 उमेदवार पात्र झाले आहेत. या उमेदवारांनी तब्बल 67 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, या सर्व उमेदवारांना येत्या मंगळवारी (दि.11) रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्‍त विजय दहिभाते यांनी सांगितले.

महापालिकेच्या प्रभाग क्र. 1 अ, आणि समाविष्ट गावांचा नव्याने झालेला प्रभाग क्र. 42 च्या नगरसेवक पदाच्या दोन जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या तीन जागांसाठी 52 उमेदवारांनी 67 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानुसार प्रभाग क्र. 1 अ मध्ये 12 उमेदवारांनी 18 अर्ज दाखल केले आहेत. तर प्रभाग क्र. 42 अ च्या 24 उमेदवारांकडून 30 अर्ज भरले गेले होते तर प्रभाग क्र. 42 ब च्या सर्वसाधारण महिला आरक्षित जागेसाठी 16 उमेदवारांनी 19 अर्ज दाखल केले होते. या सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.