राजस्थानमध्ये बसपाच्या सर्व आमदारांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

जयपूर : राजस्थानमधील बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सर्व सहा आमदारांनी सत्ताधारी पक्ष कॉंग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्री त्यांनी कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे पत्र विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांना दिले. जोशी यांनी याची पुष्टी केली आहे. बसपाच्या आमदारांनी मला पत्र दिले असल्याचे म्हटले आहे.

आमदार राजेंद्रसिंग, जोगेंद्रसिंग आवाना, वाजिब अली, लखनसिंग मीना, संदीप यादव आणि दीपचंद यांनी बसपाला रामराम ठोकला आहे. यासर्वांनी आपले विधिमंडळ पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करत असल्याचे महटले. बसपाचे सर्व सहा आमदार मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी सतत संपर्कात होते आणि सोमवारी ते कॉंग्रेसमध्ये दाखल झाले असल्याचे कॉंग्रेसच्या एका नेत्याने म्हटले आहे. विशेष म्हणजे 200 सदस्यीय राजस्थान विधानसभेत शंभर आमदार आहेत. कॉंग्रेसला राष्ट्रीय लोक दलाच्या (आरएलडी) आमदाराचाही पाठिंबा आहे. याशिवाय 13 मधील 12 अपक्षांनीही पाठिंबा दर्शविला आहे. अद्याप दोन जागा रिक्त आहेत. महत्त्वाचे म्हणजे 2018 च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला एकूण 99 जागा मिळाल्या. तर भाजपाला 73 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत कॉंग्रेस एकल सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आली असली तरी, एका जागेवर ती पूर्ण बहुमताने गमावली. कॉंग्रेसने बसपा व अपक्ष आमदारांच्या मदतीने स्वत: चे सरकार स्थापन केले.बसपाचे सर्व 6 आमदार कॉंग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर गेहलोत सरकार आता स्वबळावर संपूर्ण बहुमत असलेले सरकार बनले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.