आॅक्टोबरपासून ‘विमान प्रवास’ महाग होण्याची शक्यता

नवी दिल्ली – सर्व एअरलाईन आॅक्टोबरपासून विमान (हवाई) प्रवासात भाडेवाढ करू शकतात. ज्यामुळे विमान (हवाई) प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही येणाऱ्या सणांच्या दरम्यान किंवा आॅक्टोबरमध्ये विमान प्रवास करू इच्छिता, तर ही माहिती नक्की वाचा. सरकार व्दारे विमानचालन टर्बाइन इंधन (एटीएफ) वर कस्टम ड्यूटी लावल्यानंतर विमान प्रवासाच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही भाडेवाढ पुढील महिन्यांपासून होऊ शकते. येत्या महिन्यांत नवरात्री, दसरा आणि दिवाळी असे सण येणार आहेत.

माध्यमांच्या माहितीनुसार तज्ञांनी सांगितले आहे की, इतर कंपन्याशी स्पर्धा, तेलाचे वाढते भाव आणि इतर खर्चाचा भार विमान कंपन्यावर पडत आहे. तसेच अलीकडेच एटीएफ वर लावण्यात आलेल्या 5 टक्के कस्टम ड्यूटीमुळे यांमध्ये आणखीच भर पडली होती. त्यानंतर मागील काही आठवड्यात एयरलाइन इंडस्ट्रीजने आॅक्टोबर मध्ये विमान प्रवास महागण्याचे संकेत दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आॅक्टोबर महिना हा सणांचा आहे. या महिन्यांत विमान प्रवास करण्याच्या संख्येत वाढ होत असते. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यांत विमान प्रवासाच्या भाड्यात वाढ केल्यास होणारा तोटा कमी होऊ शकतो, असे तज्ञांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)