आलियाच्या काकांचा रणबीरबरोबरच्या लग्नाला विरोध

बॉलिवूडमधील अनेक जोड्यांचे विवाह गेल्या वर्ष-दिड वर्षाच्या काळात होऊन गेली आहेत. आता आलिया भट आणि रणबीर ही एकमेव “एलिजीबल जोडी’ लग्नाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या घोषणेकडे पब्लिकचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांचे लग्न 2020 च्या डिसेंबरमध्ये होणार. त्यांच्या लग्नासाठी सब्यसाचीना वेडिंग डिजाईनचे काम दिले जाणार. ऋषी कपूर उपचार घेऊन परतल्यावर अधिकृत घोषणा होणार, वगैरे वगैरे अफवा आतापर्यंत पिकल्या होत्या. पण अजूनही त्यांच्या विवाहाची अधिकृत घोषणा झालेली नाही.

मात्र आता एक धक्कादायक बाब समजली आहे. आलिया भटचे काका, महेश भट यांचे बंधू मुकेश भट यांनी तर उघडपणे अलिया- रणबीरच्या लग्नाची शक्‍यताच फेटाळून लावली आहे. ही अफवा कोण पसरवतय ? असा प्रश्‍न त्यांनी विचारला. दुसरीकडे आलियाचा बंधू राहुल भट याची प्रतिक्रिया देखील खूप गोंधळात टाकणारी होती. “आलिया माझी सावत्र बहिण आहे. आम्ही एकत्र रहात नाही. त्यामुळे नक्की काय होणार आहे, मला माहिती नाही. रणबीरबरोबर आलियाची जोडी बघायला मला नक्कीच आवडेन. जर मला त्यांच्या लग्नाचे निमंत्रण पाठवले गेले, तर लग्नामध्ये सामील व्हायला मला आवडेल’ असे तो म्हणाला. म्हणजे यांचे लग्न ठरते आहे की नाही, याचा राहुलला पत्ताच नाही.

महेश भट आणि सोनी राझदान हे दोघेही यावर प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. लग्नाची तयारी झाल्याची अफवा आहे, असे सोनी राझदान काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्य. सध्या अलिया आणि रणबीर युरोपात सुटी एन्जॉय करत आहेत. आलियाच्या हातात तीन सिनेमे आहेत, तर रणबीर त्याच्या आगामी सिनेमांच्या शुटिंगची तयारी करतो आहे. “ब्रम्हास्त्र’मध्ये दोघेही एकत्र असणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.