मुंबई – बॉलीवूडमध्ये क्यूट ऍण्ड स्टायलिश अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट ओळखली जाते. तर ‘ब्युटी विथ ब्रेन’ अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोण ओळखली जाते.
सध्या या दोघींच्याही अभिनयाने चाहत्यांच्या मनावर जादूच केली आहे. बॉलीवूडच्या या अभिनेत्री नेहमीच चर्चेत असतात. यातच पुन्हा एकदा आलीय आणि दीपिका चर्चेत आल्या आहे मात्र यावेळी अभिनयामुळे नव्हे तर, यंदाच्या वर्षातील आशियातील सर्वाधिक सेक्सी महिला म्हणून निवड झाल्यामुळे चर्चेत आहे. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टची यंदाच्या वर्षातील आशियातील सर्वाधिक सेक्सी महिला म्हणून निवड झाली आहे तर दशकातील सर्वाधिक सेक्सी महिलेचा मुकुट दीपिका पदुकोण हिला मिळाला आहे.
बुधवारी लंडन येथे ऑनलाईन निवडीचा निकाल जाहीर केला गेला. साप्ताहिक इस्टर्न आय तर्फे या वर्षाची ही यादी जाहीर केली गेली. आलिया तिच्या या यादीमध्ये निवडीबाबत आनंद व्यक्त करत म्हणाली,’खरे सौंदर्य दिसते त्यापेक्षा अधिक असते. आम्ही वृध्द होऊ तेव्हा आमच्या सौंदर्यात बदल होणार आहेच. पण मन आणि हृद्य चांगले असेल तर व्यक्ती नेहमीच सुंदर दिसते हे लक्षात घेतले पाहिजे.’