मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर नुकताच आपल्या आगामी ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. त्या दरम्यान चित्रपटाची नायिका आलिया भट्टही त्यांच्यासोबत होती.
ताज्या माहितीनुसार, रणबीर कपूर, आलिया भट्ट ब्रह्मास्त्र चित्रपटासाठी गाण्याचे चित्रीकरण बनारस येथे करीत आहे. ब्रह्मास्त्र या चित्रपटात रणबीर कपूर एका सुपरहिरोच्या अवतारात दिसणार आहे.
या चित्रपटात बर्फी बॉयसह अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, शाहरुख खान, मौनी रॉय यांच्या मुख्य भूमिका आहेत. करण जोहरच्या बॅनरखाली ब्रह्मास्त्र हा चित्रपट तयार होत असून तीन भागात प्रदर्शित होणार आहे.