अलीगड मुस्लिम विद्यापीठ भारताचा अमूल्य ठेवा

नवी दिल्ली –  पंतप्रधान नरेंद्र मोदी  आज अलीगड मुस्लिम विद्यापीठ अर्थात AMUच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी  झाले.  आज  AMU  विद्यालयाला 100 वर्षे पूर्ण होत असल्याने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.  कोविडच्या  पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे AMU  विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी होणारे  मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. यापूर्वी 1964 मध्ये तत्कालीन पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री AMUच्या दिक्षांत सोहळ्यात सहभागी झाले होते.

या  शताब्दी सोहळ्या  दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं  कौतुक केलं. ते यावेळी म्हणाले, ‘AMU  विद्यापीठाच्या भिंतीवर देशाचा इतिहास कोरला गेला आहे.  या विद्यापीठातील विद्यार्थी जगात भारताचं नाव प्रकाशमान करत आहेत.  परदेश दौऱ्यावेळी  या विद्यापीठात शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या अनेक  भेटी झाल्या. तेव्हा ते नेहमी हास्य विनोद आणि शेरो शायरीमध्ये रममाण होतात. ते अभिमानानं सांगतात की, आम्ही अलिगढ मुस्लिम विद्यापीठात शिकलो आहोत. हे विद्यापीठ भारताचा अमूल्य ठेवा आहे. या इमारतीशी शैक्षणिक इतिहास जोडला गेलेला आहे.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.