लंडन – या आठवड्यात म्हणजेच 2 जुलै रोजी जागतिक युएफओ दिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने पुन्हा एकदा उडत्या तबकड्या आणि परग्रहवासीयांची चर्चा सुरू झाली आहे ब्रिटनच्या युएफओ प्रोग्रामचे माजी प्रमुख निक पोप यांनी आता असा दावा केला आहे की एलियंस म्हणजेच परग्रहवासी आजही मानवाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोप यांनी ओपन स्काय क्लोज माईंड नावाचे पुस्तक लिहिले असून त्यामध्ये अशा प्रकारचे अनेक दावे करण्यात आलेत आहेत 2022 मध्ये अमेरिकेतील काही विमाने आकाशात उडत असताना उडत्या तबकड्याशी त्यांची धडक होता होता वाचली अशी माहिती पेंटागनने दिल्याचा दावाही निक पोप यांनी केला आहे विमाने आणि उडत्या तबकड्या यांची धडक टाळण्याच्या किमान अकरा घटना घडल्या आहेत असे पेंटॅगॉनने म्हटल्याचे निक पोप यांनी म्हटले आहे अमेरिकन नौदलानेही काही व्हिडिओ प्रसारित करून एलियन्स बाबत चर्चा सुरू केल्याची माहिती निक पोप यांनी दिली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये जगात सर्वत्रच उपग्रहाच्या माध्यमातून संदेश देवाणघेवाणीची तीव्रता वाढली असल्याने या उपग्रहामुळे निर्माण होणाऱ्या संदेशलहरींना प्रतिसाद देण्याच्या निमित्तानेच हे परग्रहवासी या पृथ्वीच्या दिशेने येत असावेत असा दावाही निकोप यांनी केला आहे ब्रह्मांडाला अब्जावधी वर्षाचा इतिहास आहे मानवाला फक्त पृथ्वीवरच जीव सृष्टी असल्याची माहिती आहे पण ब्रह्मांडातील इतर ठिकाणी जीवसृष्टी असू शकेल का याबाबत कित्येक वर्ष संशोधन सुरू आहे पण निक पोप यांच्यासारख्या शास्त्रज्ञांच्या मते मात्र परग्रहवासी आहेत.
आणि ते पृथ्वीवरील मानवाशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत परग्रहवासीयांचा संपर्क झाल्यावरच ते माणसाचे मित्र आहेत का शत्रू आहेत हे सिद्ध होणार आहे पण या निमित्ताने एक वेगळ्या संस्कृतीची ओळख पृथ्वीवरील लोकांना होणार आहे नजीकच्या काळात परग्रहवासीयांचा जर पृथ्वीशी संपर्क झाला तर सध्या अस्तित्वात असलेल्या धर्मविषयक आणि संस्कृतीविषयक सर्व संकल्पनाच बदलून जातील असेही निक पोप यांनी म्हटले आहे.