“गंगूबाई’साठी पहिली पसंती नव्हती आलिया

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्‌टचे संजय लीला भंसाली यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. भंसाली यांनी आपल्या आगामी “गंगूबाई काठियावाडी’मध्ये लीड रोलसाठी आलियाला कास्ट केले आहे.

दरम्यान, यापूर्वीही भंसाली यांनी आलियाला सलमान खानसोबत “इंशाअल्लाह’साठी कास्ट केले होते. परंतु या चित्रपटाची निर्मिती होण्याआधीच तो बंद पडला. भलेही आलियाला “गंगुबाई काठियावाडी’साठी कास्ट करण्यात आले. परंतु या चित्रपटासाठी ती भंसाली यांची पहिली पसंती नव्हती.

हा चित्रपट सध्या खूपच चर्चेत आहे. कारण तो कमाठीपुराची मॅडम म्हणून ओळखली जाणारी गंगूबाई कोठेवाली यांच्या जीवनावर आधारित आहे. या भूमिकेसाठी प्रियांका चोप्रालाही कास्ट करण्यात येणार होते. परंतु भंसाली यांना या भूमिकेसाठी राणी मुखर्जी ही सर्वप्रथम पसंती होती. परंतु राणीसोबत न जुळल्याने त्यांनी प्रियांकाशी चर्चा केली.

तेव्हा भंसाली “बाजीराव मस्तानी’चे शूटिंग करत होते. तेव्हा प्रियांकासोबतही चर्चा फिसकटली. कारण प्रियांकाही एका हॉलिवुड प्रोजेक्‍ट्‌समध्ये बिझी होती. त्यानंतर या भूमिकेसाठी आलिया भट्‌टला कास्ट करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.