चित्रपट दिग्दर्शक अयान मुखर्जी, अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना बनारसमध्ये गोण शूटिंग करताना कॅमे-यात स्पॉट करण्यात आले आहे. हे गाणे रेमो डिसूजाने कोरियॉग्राफ केले असल्याचे समजते. रणबीर आणि आलियासोबतच रेमोही चित्रपटाच्या सेटवर संपूर्ण टीमसोबत सहभागी झाला होता.
काही महिन्यांपूर्वी बनारस येथील चेतसिंह किल्ल्यावर चित्रपटाची एक आठवडा शूटिंग होणार असल्याची चर्चा होती. यावेळी स्पॉट करण्यात आलेल्या रणबीर कपूरने हिरव्या रंगाच्या टी-शर्ट आणि लाईट ब्ल्यू जीन्ससोबत जॅकेट परिधान केलेले होते. दुसरीकडे आलिया भट्टने व्हाईट टॉप आणि ब्ल्यू जीन्समध्ये खूपच हॉट दिसत होती.
दरम्यान, “ब्रह्मास्त्र’ चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित होणार होता. मात्र, वीएफएक्सचे काम पूर्ण न झाल्याने या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले. या चित्रपटाच्या शूटिंगला गतवर्षी बुल्गारिया येथून सुरूवात करण्यात आली होती. त्यानंतर लंडन, न्यूयॉर्क, स्कॉटलॅंड, वाराणसी आणि मनाली येथू शूट करण्यात आले आहे. त्यानंतर आता बनारसमध्ये शूटिंग सुरू आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, मौनी रॉय आणि अक्किनेनी नागार्जुन आदी कलाकार झळकणार आहे.