आलिया-रणबीरच्या शूटिंगचे फोटो व्हायरल

बॉलीवूडमधील डायरेक्‍टर अयान मुखर्जी यांचा आगामी “ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चाहत्यांमधील एक्‍साइटमेंट खूपच वाढलेली आहे. या चित्रपटातील स्टारकास्ट आणि त्याची स्टोरीलाईन खूपच रोमांचित असल्याचे बोलले जात आहे.
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्‍शन्स निर्मित या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग सध्या वाराणसी येथे सुरू असून दोन्ही कलाकारांचे सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हे फोटो फॅन पेजवरून शेअर करण्यात आली असून यात रणबीर आणि आलिया एका बोटीवर असल्याचे दिसतात. रणबीर हा ग्रीन टी-शर्ट आणि ब्ल्यू डेनिममध्ये दिसत आहे. तर आलिया व्हाईट टॉप, ब्ल्यू डेनिम आणि रेड श्रगमध्ये दिसते.

दरम्यान, रणबीर आणि आलिया ही जोडी प्रथमच पडद्यावर एकत्रित झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर हा शिवा, तर आलिया ही ईशाची भूमिका साकारत आहे. “ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर-आलियाशिवाय अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन आदी कलाकार महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.