बॉक्‍स ऑफिसवर होणार आलिया-प्रभासची टक्कर

मुंबई – बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आगामी “गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचे पोस्टर जारी करत चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे. हा चित्रपट 30 जुलै 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

दरम्यान, व्हॅलेंटाइन डेला अभिनेता प्रभासने त्याच्या आगामी “राधे श्‍याम’ चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली होती. याबाबत भंसाली यांना माहिती असताना देखील त्यांनी 30 जुलै रोजीच चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रभासचा चित्रपट हा बिग बजेट चित्रपट असून यात प्रभाससह दिग्गज कलाकार झळकणार आहे. असे असताना देखीला आलियाचा चित्रपट देखील रिलीज करण्यात येणार आहे. यामुळे बॉक्‍स ऑफिसवर दोघांमध्ये जोरदार टक्‍कर होण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, आलिया आणि प्रभास यांचा चाहतावर्ग वेगवेगळा असल्याचेही बोलले जात आहे. अशात दोन्ही चित्रपटांना याचा जास्त फटका बसणार नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच लॉकडाउनमुळे अनेक चित्रपट रखडलेले असल्याने ते एकाच दिवशी प्रदर्शित होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.