मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही तिची मोठी बहीण शाहीन भट्टसोबत स्पेशल बॉन्ड शेअर करत असते. शाहीनच्या वाढदिवसानिमित्त आलियने एक स्पेशल फोटो शेअर करत बहिणीला खास बर्थडे विश केले आहे.
या फोटोत आलिया ही आपल्या बहिणीच्या गालाची पप्पी घेताना दिसत आहे. या फोटोसोबत तिने एक स्पेशल मॅसेजदेखील लिहिला आहे. आलियाने पोस्टमध्ये लिहिले की, हॅप्पी बर्थडे माय स्वीटी. “माझी हॅप्पी प्लेस. माझी सेफ प्लेस. माझी आई. माझी बेस्ट फ्रेंड. माझी मुलगी.’ मला नाही वाटत की डिक्शनरीमध्ये अशा शब्द आहे, जो माझ्यातील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
View this post on Instagram
आलियाने पुढे लिहिले की, तुझ्या प्रेमाशिवाय मला आयुष्य कळत नाही! मी तुझ्या प्रेम आणि आनंदासाठी इच्छा व्यक्त करते. जेव्हा हवामान चांगले नसले, तेव्हा मी तुमच्यासाठी छत्री घेऊन उभा राहीन. आय लव यू माय मेलन.
दरम्यान, आलिया भट्टची बहीण शाहीन एक लेखिका आहे. तिने मानसिक आरोग्यावर एक पुस्तक लिहिले आहे. शाहीन ही महेश भट्ट यांची दुसरी पत्नी सोनी राजदान यांची मोठी मुलगी आहे. ती कायम लाइमलाइटपासून दूर असते. पण ती अनेकदा आलियासोबत पार्टीज किंवा हॉलिडेजमध्ये दिसते.