आलिया भटने “डार्लिंग्ज’चे शूटिंग सुरू केले आहे. या शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा एक फोटो तिने शेअर केला आहे. निर्माती म्हणून हा आपला पहिलाच सिनेमा असल्याचे तिने म्हटले आहे. सिनेमाचे शूटिंग सुरू करण्यापूर्वी रात्रभर आपल्याला पूर्ण शरीरात एकप्रकारची एनर्जी जाणवत होती.
सेटवर गेल्यावर आपण आपले डायलॉग विसरणार तर नाही ना, सेटवर पोहोचायला उशीर तर होणार नाही ना, अशी एक प्रकारची विचित्र भीती वाटत राहिली होती, असेही तिने म्हटले आहे.
अशी भीती वाटणे म्हणजे आपण प्रमाणापेक्षा जास्त काळजी करण्याचाच परिणाम असतो, हे तिच्या ध्यानात आले आहे. आलिया भटकडे सध्या अनेक सिनेमे आहेत.
संजय लीला भन्साळीच्या “गंगूबाई काठियावाडी’चे शूटिंग पूर्ण झाले आहे आणि आता त्याच्या पोस्टप्रॉडक्शनचे काम सुरू झाले आहे. “गंगूबाई’च्या रिलीज डेटवर आता तिचे लक्ष लागून राहिले आहे.