Alia Bhatt | अभिनेत्री आलिया भट्टने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात आपली आलिशान कार सोडून ऑटो रिक्षातून प्रवास करत असल्याचे दिसत आहे. तिची स्टाईल पाहून कुणी तिचे कौतुक करत आहे तर कुणी हा पीआर स्टंट असल्याचे म्हणत आहे. आलिया भट्टचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओत आलिया भट्टने शर्ट पँट घातल्याचं दिसत असून चेहऱ्यावर मास्कही लावला आहे. आलियाचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत लिहिले की, ‘आलियाने पब्लिसिटी स्टंट केला,’ एक प्रकारचा दिखावा,’ हे सर्व फक्त कॅमेरासाठी आहे’, असे म्हंटले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, 2012 मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधून अभिनयाला सुरुवात करणाऱ्या आलियाने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये ‘राझी’, ‘गली बॉय’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ यांचा समावेश आहे.
ती शेवटची ‘जिगरा’मध्ये दिसली होती. यानंतर आता 2025 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘अल्फा’ या चित्रपटात आलिया दिसणार आहे. याशिवाय संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्ये ती दिसणार आहे. यात विकी कौशल आणि रणबीर कपूर यांच्याही भूमिका आहेत.