मुंबई – बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्ट ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आलिया भट्टच्या आगामी “गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच दिग्दर्शिक संजय लीला भन्साळी यांना अनेक वादाच्या भोवऱ्यात अडकावे लागले होते आता पुन्हा एकदा हा चित्रपट शीर्षकामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे .
View this post on Instagram
या चित्रपटाचा शुटींगला सुरुवात झाली असली तरी चित्रपटाच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. या चित्रपटात दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा क्षेत्राबद्दल केलेल्या विधानांमुळे येथील शहराचे नाव खराब होत आहे असं म्हणत महाराष्ट्र कॉंग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी सोमवारी संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची मागणी केली आहे.
View this post on Instagram
यापूर्वी चित्रपटाच्या अडचणीत वाढ झाली होती. गंगूबाईच्या कुटुंबाने संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. संजय लीला भन्साळी यांनी लॉकडाउनपूर्वी ‘गंगूबाई कठियावाडी’ या चित्रपटातची घोषणा केली होती. यात कामाठीपुरामधल्या देहविक्री करणार्या महिलांच्या ‘गंगूबाई’ यांचा संबंध मोठ्या गुन्हेगारांशी असल्याचे दाखवले जात आहे. यावर गंगूबाई यांच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून मुंबई शहर दिवाणी न्यायालयात हुसैन झैदी, संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्या विरोधात 22 डिसेंबरला खटला दाखल करण्यात आला. त्यामुळे पुन्हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आलिया भट्टच्या आगामी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.