मुंबई – बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्ट ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आलिया भट्टच्या आगामी “गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच दिग्दर्शिक संजय लीला भन्साळी यांना अनेक वादाच्या भोवऱ्यात अडकावे लागले होते आता पुन्हा एकदा हा चित्रपट शीर्षकामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता
View this post on Instagram
चित्रपटाच्या अडचणीत वाढ झाली होती. गंगूबाईच्या कुटुंबाने संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. संजय लीला भन्साळी यांनी लॉकडाउनपूर्वी ‘गंगूबाई कठियावाडी’ या चित्रपटातची घोषणा केली होती. यात कामाठीपुरामधल्या देहविक्री करणार्या महिलांच्या ‘गंगूबाई’ यांचा संबंध मोठ्या गुन्हेगारांशी असल्याचे दाखवले जात आहे. यावर गंगूबाई यांच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून मुंबई शहर दिवाणी न्यायालयात हुसैन झैदी, संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्या विरोधात 22 डिसेंबरला खटला दाखल करण्यात आला. त्यामुळे पुन्हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आलिया भट्टच्या आगामी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
View this post on Instagram
भन्साळींच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटात अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवल्या गेल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भन्सारी यांच्या चित्रपटाविरोधात गंगुबाई काठियावाडी यांच्या मुलानेच मुंबई न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चित्रपटात अनेक चुकीच्या गोष्टी दाखवल्या असून माझ्या कुटूंबाची बदनामी होत आहे, असा आरोप गंगुबाई यांच्या मुलाने दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या प्रकरणात दिग्दर्शक भन्सारी, अभिनेत्री आलिया भट्ट आणि चित्रपटाच्या लेखकाला न्यायालयाने समन्स बजावले आहे.