आलिया भट्‌टचा साडीतही स्टायलिश लूक

बीटाउनची फॅशनिस्टा गर्ल आलिया भट्‌ट पुन्हा एकदा स्टायलिश लूकमध्ये झळकली आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती एलिगंट दिसत असून तिचा अंदाज खूपच हॉट असल्याचे दिसून येत आहे. या फोटोचे अनेक दिवाने झाले असून काही जणांनी चक्‍क आलियाला “आय लव यू’ही म्हटले आहे.
आलिया भट्‌ट या फोटोत ग्रीन कलरच्या स्टायलिश साडीत दिसते. ही साडी खूपच आकर्षक अशी आहे.

सब्यसाच्या या साडीवर तिने ऑफ शोल्डरचा ब्लाउज परिधान केला असून यात आलियाचा अंदाज एकदमच निराळा दिसून येत आहे. हिरव्या आणि पिवळया रंगाच्या कॉम्बिनेशनमधील या साडीला फ्रिल्समध्ये डिझाईन करण्यात आले आहे. ही साडी आलियाने कोणत्या कार्यक्रमासाठी परिधान केली आहे, हे अद्याप समजू शकले नाही.

दरम्यान, आलिया भट्‌ट ही तिच्या आगामी “कलंक’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यात ती पुन्हा एकदा वरुण धवनसोबत काम करत आहे. यात संजय दत्त, माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिका साकारत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.