आलिया भट्टने तिचे स्वतःचे सिनेमा प्रॉडक्शन हाऊस कालपासूनच सुरू केले आहे. “इटर्नल सनशाईन प्रॉडक्शन्स’ असे या प्रॉडक्शन हाऊसचे नाव आहे. आलियाने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये आपल्या नवीन प्रॉडक्शन हाऊसची घोषणा केली आणि आपल्या प्रॉडक्शन हाऊसचा लोगोही तिने इन्स्टाग्रामवर रिलीज केला. आलियाला मांजरी खूप आवडतात.
View this post on Instagram
तिच्या हाऊसच्या लोगोमध्येही मांजराचे चित्र स्पष्टपणे दिसते आहे. एक नाही, तर चक्क दोन मांजरी या लोगोमध्ये दिसत आहेत. आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या कथा आणायला आपल्याला नक्की आवडेल.
View this post on Instagram
आनंदी गोष्टी, उत्साहवर्धक गोष्टी, बारीक-प्रेमाची किनार असलेल्या गोष्टी, खऱ्या गोष्टी, काळाचे बंधन नसलेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला आवडेल, असे आलियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तिने ही पोस्ट केल्यानंतर थोड्याच वेळात तिच्यावर कॉमेंट बॉक्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव व्हायला लागला.
View this post on Instagram
शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये तिची आई आणि करण जोहर हे अग्रणी होते. आलिया स्वतः ‘गंगूबाई काठियावाडी’च्या अनोख्या रोलमधून प्रेक्षकांसमोर येते आहे. हा सिनेमा ती संजय लिला भन्साळीच्या प्रॉडक्शनसाठी करते आहे. मात्र आता तिला स्वतःच्या प्रॉडक्शनसाठी काही चांगले विषय हवे आहेत.