मुंबई – ‘गंगूबाई’ आणि ‘आरआरआर’ चित्रपटांच्या अफाट यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आता तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. अभिनेत्री आता आपल्या अभिनयाने आंतरराष्ट्रीय चाहत्यांना वेड लावणार आहे. दरम्यान शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी आलियाने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने पहिल्या हॉलीवूड चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार असून त्यासाठी ती खूप घाबरत असल्याचे सांगितले आहे.
आलिया नेटफ्लिक्सच्या स्पाय थ्रिलर ‘हार्ट ऑफ स्टोन’मध्ये झळकणार आहे. टॉम हार्पर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. दरम्यान आलियाने शूटिंग सुरू करण्यापूर्वी एक पोस्ट शेअर केली असून त्यात तिने लिहिले आहे की, ‘मी माझ्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. मला स्वतःला हे नवीन असल्यासारखे वाटत आहे. मी खूप घाबरले आहे. मला शुभेच्छा द्या’ अशी पोस्ट अभिनेत्रीने चाहत्यांसाठी शेअर केली आहे.