आलिया भट्टने शेअर केले उटी येथील फोटो

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही त्या एक कलाकारांपैकी आहे जी सोशल मीडियावर सतत ऍक्‍टिव्ह असते आणि आपल्या चाहत्यांना प्रत्येक गोष्टींचे अपडेट देत असते. आलिया सध्या उटी येथे असून ती आपल्या आगामी “सडक 2’चे शूटिंग करत आहे.

यानंतर चित्रपटाची संपूर्ण टीम मुंबई, उत्तराखंड आण्‌ किाश्‍मीरमध्ये शूटिंग करणार आहे. आलियाने आपल्या इंस्टाग्रामवर उटी येथील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती एका झोक्‍यावर बसलेली दिसते आणि आजू-बाजूचा परिसर हा हिरवागार असा आहे. या फोटोसह तिने एक कॅप्शन पोस्ट केली ओ, “खेळणे विसरू नका’.

यापूर्वी आलियाने एक फोटो शेअर केला होता. ज्यात ती आपली बहीण शाहीन आणि आई सोनी राजदानी यांच्यासोबत झळकते. यात आलिया आणि शाहिन एका शॉलमध्ये दिसतात. तसेच त्यांचा एक व्हिडिओ देखील इंटरनेटवर व्हायरला होत आहे. ज्यात संपूर्ण कुटुंब डायनिंग टेबलवर एकत्रित नाष्टा करताना दिसते. यात आलिया वृत्तपत्र वाचत असल्याचे दिसून येते.

दरम्यान, आलिया प्रथमच आपले वडील महेश भट्‌ट आणि होम प्रॉडक्‍शन असलेल्या “सडक 2’मध्ये काम करत आहे. या चित्रपटात तिच्यासोब आदित्य रॉय कपूरही झळकणार आहे. याशिवाय आलिया संजय लीला भंसालीच्या “इंशाअल्लाह’मध्येही दिसणार आहे. यात सलमान खान मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.