ऋषि कपूर यांची कन्या आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर-साहनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रिद्धिमा कपूर ही अभिनेत्री आलिया भट्टसोबत मस्ती करताना दिसत आहे.
रिद्धिमाने आपल्या इंस्टाग्राम हॅंडलवरून हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “माय कम्फर्ट झोन’. या फोटोत रिद्धिमा आणि आलिया खूपच मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. तसेच आलिया आणि रणबीर यांच्या अफेअर्सबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
दरम्यान, करोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे ऋषि कपूर यांच्या अंत्ययात्रेत काही ठरावीक लोकच सहभागी होऊ शकले होते. रिद्धिमासुद्धा शेवटच्या वेळी वडिलांना पाहू शकली नाही.
रिद्धिमा आणि ऋषि कपूर यांचे खूप जवळचे ऋणानुबंध होते. त्यामुळे रिद्धिमा सतत आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देत असते. अलीकडेच ऋषि कपूर यांचा फोटो शेअर करत “महान आत्मा कधीच मरत नाही’ असे तिने पोस्ट केले होते.