मुंबई – बॉलीवूडमध्ये क्यूट ऍण्ड स्टायलिश अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट ओळखली जाते. तिच्या अभिनयाने तर चाहत्यांच्या मनावर एक जादूच केलेली आहे. तिच्या प्रत्येक गोष्टींवर चाहत्यांची नजर असते. त्यामुळे आलिया सतत आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. यातच आलिया भट्ट सारखा दिसणार कॉमेडियन आणि यूट्यूब स्टारचा सध्या फोटो वायरल होत आहे.
That was the first thing I said to the photographer when I saw it:
“Damn! I think I look like Alia”
? https://t.co/vhP1ICSqN0— Bhuvan Bam (@Bhuvan_Bam) November 23, 2019
दरम्यान, कॉमेडियन आणि यूट्यूब स्टार भुवन बामने स्वतःहा इन्टाग्रामवर त्याचा फोटो शेअर केला तसेच या फोटोला कॅप्शन केली की,’आलिया, कृपया माझ्यासोबत कॉफी डेटला चल, कारण मी माझ्या क्रश सारखा दिसतो.’ सध्या या फोटोला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. एक युजर्सने तर आलियाला दाढी आणि मिशी असलेली आलिया भट्ट म्हटले आहे.
दरम्यान, वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास आलिया सध्या “ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि मौनी रॉय झळकणार आहेत.