तेलुगू सुपरस्टार प्रभासची फॅन फॉलोइंग केवळ भारतच नव्हे तर जगभरात आहे. आता त्याच्या चाहत्यांच्या यादीमध्ये बॉलिवूडचे नवीन नाव समाविष्ट झाले आहे आणि हे नाव इतर कोणते नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात हुशार अभिनेत्री म्हणून गणली जाणारी आलिया भट्ट आहे.
आलियाने एका मुलाखतीत सांगितले की, “बाहुबली’ सुपरहिट चित्रपटात प्रभासच्या अभिनयाने तिला वेड लागले आहे. या मुलाखतीत आलियाला तिच्या आवडत्या स्टारबद्दलही विचारण्यात आले होते. तेव्हा ती म्हणाली, मला प्रभास खूप आवडतो. बाहुबली चित्रपटात त्याची कामगिरी आणि पडद्याची उपस्थिती जबरदस्त होती. बाहुबली सिरीज पाहिल्यानंतर मी त्याच्या प्रेमात पडले आहे.
दरम्यान, आलिया भट्ट लवकरच दक्षिणच्या चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. छोटा एनटीआर आणि राम चरण यांच्यासमवेत ती एसएस राजामौलीच्या “आरआरआर’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. अजय देवगन देखील या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय आलियाकडे रणबीर कपूरसोबत “ब्रह्मास्त्र’, “सडक 2′, “गंगूबाई काठियावाडी’ आणि करण जोहरचा “तख्त’ आदी चित्रपटात झळकणार आहे.