मुंबई – बॉलीवूडमध्ये क्यूट ऍण्ड स्टायलिश अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट ओळखली जाते. तिच्या अभिनयाने तर चाहत्यांच्या मनावर एक जादूच केलेली आहे. तिच्या प्रत्येक गोष्टींवर चाहत्यांची नजर असते. त्यामुळे आलिया सतत आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. आलियाचा हॉट आणि सेक्सी अंदाज कुणालाही नक्कीच इंस्टाग्रामवर युजर्सला घायाळ करते तिचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
मात्र अनेक कलाकारांनी सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरलं आहे. यामध्ये सर्वाधिक टीका होतेय ती अभिनेत्री आलिया भट्टवर. दरम्यान अभिनेता कमाल आर. खान याने देखील तिच्यावर निशाणा साधला आहे. देशातील ७५ टक्के लोकांना यापुढे तिचे चित्रपट पाहायचे नाहीत, असा दावा त्याने केला आहे.
आलिया भट्टवर सध्या सोशल मीडियाव्दारे प्रचंड टीका होत आहे. या टीकेमुळे तिची सोशल मीडियावरील लोकप्रियता कमालीची कमी झाली आहे. तिचे तब्बल चार लाख ४४ हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कमाल खानचे हे ट्विट सध्या सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.