Ali Khamenei । इराण आणि इस्रायलमधील तणाव आता उघड युद्धात रूपांतरित झाला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी आज सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “युद्ध सुरू झालंय…” असे म्हटले आहे. दरम्यान , आता इराण आणि इस्रायलमधील संघर्ष सहाव्या दिवशीही सुरू आहे. इराणने इस्रायलवर हल्ला केला आहे. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने १२ ठिकाणी हल्ला केला.
अयातुल्ला अली खामेनी यांनी यावेळी आपल्या पोस्टमध्ये, “आम्ही दहशतवादी ज्यू राजवटीला कडक उत्तर देऊ, आम्ही त्यांना कोणतीही दया दाखवणार नाही.” असे म्हटले आहे. खामेनी यांच्या घोषणेनंतर काही वेळातच इराणने इस्रायलच्या दिशेने २५ क्षेपणास्त्रे डागली. ही घटना दोन्ही देशांमधील वाढत्या संघर्षाचे युद्धात रूपांतर होण्याचे लक्षण मानली जाते.
यापूर्वी, खमेनी म्हणाले होते की, “ते झिओनिस्ट राजवटीशी कधीही तडजोड करणार नाहीत.” त्यांचे विधान आणि क्षेपणास्त्र हल्ला पुष्टी करतो की इराण आता उघडपणे युद्धात उतरला आहे. या घटनेनंतर, संपूर्ण मध्य पूर्वेत तणाव आणखी वाढला आहे.
We must give a strong response to the terrorist Zionist regime.
We will show the Zionists no mercy.— Khamenei.ir (@khamenei_ir) June 17, 2025
इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी खमेनींना कडक इशारा Ali Khamenei ।
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना कडक इशारा दिला आहे. जर खामेनी इस्रायलविरुद्ध हाच मार्ग अवलंबत राहिले तर त्यांची अवस्थाही इराकी शासक सद्दाम हुसेनसारखी होऊ शकते, असे त्यांनी म्हटले.
काट्झ यांनी सद्दाम हुसेन यांचे नाव घेत ‘हे’ म्हटले Ali Khamenei ।
काट्झ यांनी त्यांच्या विधानात म्हटले आहे की, “खामेनी यांनी इस्रायलला विरोध करणाऱ्या हुकूमशहाचे काय झाले हे लक्षात ठेवावे.” ते थेट सद्दाम हुसेन यांच्या नशिबाकडे लक्ष वेधत होते, ज्यांना आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपानंतर सत्तेवरून काढून टाकण्यात आले आणि फाशी देण्यात आली.