बॉलीवूड अभिनेता अली फजल हा आपल्या आगामी इंटरनॅशलन प्रोजेक्टसाठी नुकताच लंडनला रवाना झाला आहे. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी अली हा आपल्या एका प्रसिद्ध वेबसीरीजच्या दुस-या भागाच्या चित्रिकरणात व्यस्त होता. पण लंडनल्या जाण्यासाठी त्याने याचे चित्रिकरण तातडीने पूर्ण केले.
“व्हिक्टोरिया ऍण्ड अब्दुल’ या पहिल्या चित्रपटात जूडी डेंचसोबत अली फजल झळकला होता. त्यानंतर फजलकडे अनेक इंटरनॅशल चित्रपटाच्या ऑफर आल्या असून त्यावर तो काम करत आहे. सध्या त्याने एक ब्रिटिश चित्रपट साईन केला आहे. पण या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या चित्रपटातील भूमिका साकारण्यासाठी अलीने लॅंग्वेज आणि डिक्शनचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, अली फजलकडे या ब्रिटिश चित्रपटाशिवाय आणखी एक हॉलिवूड चित्रपट आहे. तसेच तो बॉलिवूडमधील “भूत पुलिस’ चित्रपटातही काम करत आहे. यात त्याच्यासोबत सैफ अली खान आणि फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.