#AusOpen : ‘वावरिंका-झ्वेरेव’ उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने

मेलबर्न : आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरूष एकेरीच्या चौथ्या लढतीच्या सामन्यात स्टेन वावरिंकाने डॅनिल मेव्देदेवचा तर दुसरीकडे अलेक्झांडर झ्वेरेवने आंद्रे रूब्लेवचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत बुधवारी (२९ जानेवारी)स्टेन वावरिंका विरूध्द अलेक्झांडर झ्वेरेव असा सामना रंगणार आहे.

सोमवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या चौथ्या फेरीत १५ व्या मानांकित स्टेन वांवरिकाने चौथ्या मानांकित रशियाच्या डॅनिल मेव्देदेवचा २-६, ६-२, ६-४, ६(२)-७(७), २-६ असा पराभव केला.

दुसरीकडे अन्य गटाच्या पुरूष एकेरीच्या चौथ्या फेरीच्या सामन्यात सातव्या मानांकित जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवने १७ व्या मानांकित आंद्रे रूब्लेवचा ६-४, ६-४, ६-४ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here