अलर्ट : रेमडेसिविर इंजेक्‍शन संदर्भात केंद्र सरकारची महत्वाची घोषणा

नवी दिल्ली – रेमडेसिविर इंजेक्‍शन संदर्भात महत्वाची घोषणा केंद्राने केली आहे. देशात या औषधाची कमतरता जाणवत असल्याने वाढलेल्या किमती नियंत्रणात याव्यात आणि मुबलक प्रमाणात हे औषध सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावे यासाठी या औषध निर्मितीत लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवरचे शुल्क माफ केले गेले आहे आणि या औषधाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना उत्पादन दुपटीने वाढविण्याचे आदेश दिले गेले आहेत.

मोदी सरकारने रेमडेसिविर एपीआय, रेमडेसिविर इंजेक्‍शन, बीटा सायक्‍लोडेक्‍सट्रीन यावरील आयात शुल्क माफ केल्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्‌विट केले आहे. यामुळे रेमडेसिविर इंजेक्‍शनचा पुरवठा वाढण्यास, खर्च कमी होण्यास आणि रुग्णांना ते अधिक स्वस्त दरात मिळण्यास हातभार लागणार आहे.

कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडने त्यांच्या रॅमडॅक औषधाची किंमत 2800 वरून 899 वर आणली आहे. त्याचबरोबर सिंजीन इंटरनॅशनल लिमी, रेम्विनची किंमत 3950 वरून 2450 वर, डॉ. रेड्डीजने रेडएक्‍स इंजेक्‍शनची किंमत 5400 वरून 2700 वर, 

सिप्लाने त्याच्या सीआयपी रेमीची किंमत चार हजारवरून तीन हजार वर, मायलेन फार्माने त्याच्या डीईबीआरईएमची किंमत 4800 वरून 3400 वर तर ज्युबिलंट जेनेरिकने त्यांच्या जुबीआरची किंमत 4700 वरून 3400 वर आणली आहे. हेतेरी हेल्थकेअरने कोवीफोर इंजेक्‍शनची किंमत 5400 वरून 3490 वर आणली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.