मद्यविक्री घटली…; महसुलातही 37 टक्के घट

पुणे – करोनाचा फटका राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागालाही बसला आहे. करोनामुळे मद्यसेवन करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून बंद बारमुळे तोट्यात आणखी वाढ झाल्याचे दिसून येते.

सप्टेंबर 2019 मध्ये उत्पादन शुल्क विभागाला 178 कोटींचा महसूल मिळाला होता. यंदाच्या वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये मात्र हा महसूल 66 कोटींनी घटत 112 कोटींवर पोहोचला. अर्थात तब्बल 37 टक्‍क्‍यांनी महसूल घटल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून सोमवारी देण्यात आली.

दरम्यान, 5 ऑक्‍टोबरपासून पुण्यासह राज्यातील हॉटेल-बार डाइन इनसाठी खुले झाले असल्याने येत्या 2-3 महिन्यांत तुटीचा आकडा काही प्रमाणात भरून निघेल, असा विश्‍वास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.