आळंदी – देहू-आळंदी रस्त्याला जोडणारा केळगाव-डुडुळगाव (मोशी) असा नवीन पूल खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून पाच वर्षांपूर्वी पुलाचे काम 25 लाख रुपये मंजूर करून सुरू करण्यात आले.
केळगाव बाजूने डुडुळगाव कडे जाणारा 400 मीटर लांबीचा पूल शासन स्तरावर पूर्ण करण्यात आला; मात्र पुढील हद्द म्हणजेच पूररेषेनंतरची हवेली तालुक्यात डुडुळगाव हद्दीत पूररेषा नियंत्रण ओलांडून पुढील काम शेतकऱ्यांना मोबदला त्यांच्या म्हणण्यानुसार न दिल्याने पुढील हवेली हद्दीतील काम रखडले असल्याचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले.
त्यासाठी शेतकऱ्यांना पुरेपूर मोबदला मिळावा हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुढील कार्यवाही शासन स्तरावर आयुक्तांकडे तसेच जिल्हाधिकारी यांच्या दरबारी आहे. उर्वरित नवीन पुलाचे काम येत्या काही महिन्यातच पूर्ण करणार असल्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले.