आळंदी : खासदार प्रीतम मुंडे यांची ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिरास भेट

आळंदी – भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी शनिवारी (दि. 23) श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिरास भेट देऊन मंदिर बांधकामाची पाहणी केली. श्री ज्ञानेश्वरी मंदिराचे संस्थापक ह.भ.प. गोविंद महाराज केंद्रे बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराचे उत्तराधिकारी महंत ह.भ.प. विष्णू महाराज केंद्रे यांनी प्रीतम मुंडे यांना संस्थापक केंद्रे बाबा यांचा कार्य परिचय दिला.

श्री क्षेत्र आळंदी येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर हे विश्वातील एकमेव मंदिर आहे जेथे मंदिराच्या भिंतींवर ज्ञानेश्वरीतील संपूर्ण ओव्या कोरण्यात आल्या आहेत. लोकवर्गणीतून उभारलेल्या या मंदिरातील ओव्या कोरण्याचे कार्य पूर्ण झाले असून काही बांधकाम अद्यापही अपूर्ण आहे.

यावेळी श्री भास्कर महाराज पवार, पिंपरी चिंचवड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे, उपमापौर केशव घोळवे, उद्योजक आबाशेठ नागरगोजे, डाॅ. विजय बडे, डाॅ. भार्गवी बडे, संजय घुडरे, नगराध्यक्ष अशोक उमरगेकर, अशोक मुंडे, रवी खेडकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर पिंगळे उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.