आळंदी – श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था व सांस्कृतिक व नैतिकमूल्य प्रशिक्षण प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रम श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर आळंदी देवाची या प्रशालेत संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, शिक्षक प्रतिनिधी अल्लाबक्ष मुलाणी हे मान्यवर उपस्थित होते.