दक्षिणेवर डल्ला मारुनही आळंदी देवस्थान गप्प

मोजणी करणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्याची केवळ घरी पाठवणी

आळंदी – भाविकांनी दानपेटीत टाकलेल्या दक्षिणेच्या रकमेची मोजणी करण्यासाठी नेमलेल्या हंगामी कर्मचाऱ्याला पैशांची चोरी करताना सिसीटीव्ही फुटेजमधे पकडले.आळंदी देवस्थानचे विश्वस्तांच्या कानावर चोरीच्या घटनेची माहिती गेल्यावर तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यास नारळ देत घरी पाठवणी केली. दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल का, केला नाही याबाबत मंदिर परिसरात चर्चा रंगली होती.

कार्तिकी एकादशी दिनी शनिवारी (दि. 23) संध्याकाळी देवस्थानच्या कार्यालयात बसून वारीसाठी तात्पुरत्या स्वरूपात सेवाभावी कर्मचारी नेमले जातात. दरम्यान सात ते आठ लोक भाविकांनी दानपेटीत टाकलेल्या पैशांची मोजणी करतात. यातील एकाने पैसे मोजता मोजता काही नोटी मांडीखाली दडपून ठेवल्यानंतर खिशात ठेवल्या ही या घटना सिसिटीव्हीत कैद झाल्यानंतर शहरात चर्चा झाली.

बंदोबस्तावरिल एका पोलिसाने याबाबत तक्रार करण्याची मागणीही केली. मात्र, देवस्थानच्या संबंधित काही लोकांनी देवस्थानची बदनामी होईल या हेतून चोर कर्मचाऱ्यासह त्याच्या बरोबरच्या इतर सेवाभावी कर्मचाऱ्यांना नारळ देत घरी रवानगी केली. हा कर्मचारी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमधी असून गेली 10 ते 12 वर्षे आळंदी देवस्थानमध्ये वारीत देणगी पेटीतील पैसे मोजायचे काम करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यानंतर चर्चा रंगली ती चोरावर पोलीस कारवाई का केली नाही याची. यापूर्वीही माउलींच्या समाधीवर हात मारणाऱ्या पुजाऱ्यावर कारवाई करण्याचे देवस्थानने टाळले होते. अशा रितीने चोरांचे फावेल, असे अनेकांचे मत होते. मात्र, आळंदी देवस्थानने कारवाई टाळली.

संबंधित घटनेबाबत माहिती घेतली जाईल. सध्या हंगाम कर्मचाऱ्याला त्वरीत काढून टाकले आहे. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी देवस्थानच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा अधिक सक्षम करून चांगल्या प्रतीचा ठेवला जाईल. त्यात स्पष्टपणे चोरी अथवा इतर घटना कैद झाल्या पाहिजेत.
– ऍड. विकास ढगे, प्रमुख, आळंदी देवस्थान

Leave A Reply

Your email address will not be published.