काश्मीरात ‘हमिद लेल्हारीला’ ठार करण्यात लष्कराला यश

जम्मू-काश्मीर – सुरक्षा पथकांनाी काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली आहे. काश्मीरच्या अल-कायदा संघटनेचा प्रमुख हमिद लेल्हारीला मंगळवारी संध्याकाळी सुरक्षा पथकांनी ठार केले आहे. त्याला झाकीर मुसाचा वारसदार म्हणून पाहिले जात होते. अल-कायदाशी संबंधित असलेल्या अन्सर गझवत उल हिंदने झाकीर मुसाच्या मृत्यूनंतर हामिद लेल्हारीला नवीन कमांडर म्हणून घोषित केले होते.

दरम्यान, झाकीर मुसा हा मे २०१९ मध्ये सुरक्षा पथकांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला होता. मंगळवारी संध्याकाळी अवंतिपोरामध्ये झालेल्या चकमकीत हामिद लेल्हारी आणि त्याचे दोन साथीदार ठार झाले. सुरक्षा पथकांना या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या भागाला घेराव घातला आणि शोधमोहिम सुरु केली. या मोहिमेदरम्यान त्यांनी ही कारवाई केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.