Akshaya Deodhar | झी मराठी पुरस्कार सोहळ्यात एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. ‘लक्ष्मी निवास’ असे या मालिकेचे नाव आहे. विशेष म्हणजे या मालिकेत दिग्गज कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे. या मालिकेद्वारे ‘पाठकबाई’ अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर पुनरागमन करणार आहे.
तिच्यासोबतच हर्षदा खानविलकर सुद्धा झी मराठीवर पुनरागमन करत आहे. यात अभिनेते तुषार दळवी सुद्धा पाहायला मिळतील. ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी या दोघांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. लक्ष्मी आणि श्रीनिवास या भूमिका हे दोघंही साकारणार आहेत.
श्रीनिवास हे एका कार कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत असतात, तर लक्ष्मी गृहिणी असतात. आपल्या मुलींचं थाटामाटात लग्न व्हावं आणि आपण हक्काचं घर बांधावं असं यांचं स्वप्न असतं. या स्वप्नादरम्यानचा प्रवास ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या मुलीची भूमिका मालिकेत अक्षया देवधर साकारणार आहे. पुन्हा एकदा अक्षयाला पाहण्यासाठी आता चाहते देखील उत्सुक आहेत.
View this post on Instagram
या मालिकेचा प्रोमोही सोशल मीडियावर सुद्धा रिलीज करण्यात आला असून प्रेक्षकांमध्ये या मालिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र अद्याप ही मालिका कधीपासून आणि कोणत्या वेळेत सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
यापूर्वी अक्षया ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत दिसली होती. यातील ‘पाठकबाई’च्या भूमिकेने ती घराघरात पोहचली होती.
हेही वाचा:
दहिसर मतदारसंघात अचानक उमेदवार बदलला; ठाकरे गटाकडून आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, नंतर…