मुंबई – अल्पावधीतच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अजोड कलागुणांच्या जोरावर एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आज आपला जीवनप्रवास थांबवला. मुंबईतील आपल्या निवासस्थानी त्याने गळफास घेत आत्महत्या केली. सुशांतची ही अकाली एक्झिट सर्वांच्याच जीवाला घोर लावणारी ठरली असून सुशांत आपल्यातून निघून गेला आहे हे सत्य पचवणं जड जातंय.
सुशांतच्या मृत्याबाबत अभिनेता अक्षय कुमार याने आपल्या ट्विटर खात्यावरून शोक व्यक्त केला आहे. अक्षय लिहतो, ‘सुशांतच्या जाण्याच्या वृत्ताने मोठा धक्का बसलाय. मला आठवतं की, मी सुशांतचा छिछोरे चित्रपट पाहून त्या चित्रपटाचा निर्माता साजिदला मला हा चित्रपट प्रचंड आवडल्याचं सांगितलं होतं. खरोखरंच सुशांत हा खूपच प्रतिभावंत अभिनेता होता. देव त्याच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.’
Honestly this news has left me shocked and speechless…I remember watching #SushantSinghRajput in Chhichhore and telling my friend Sajid, its producer how much I’d enjoyed the film and wish I’d been a part of it. Such a talented actor…may God give strength to his family 🙏🏻
— Akshay Kumar (@akshaykumar) June 14, 2020