“फादर्स डे’निमित्त सर्वजणांनी आपल्या वडिलांना विश केले आणि नेहमीप्रमाणे यावेळेसही सोशल मीडियावर वडील आणि मुलांच्या नात्यांबाबत संदेश देत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अशाही काही पोस्ट दिसून आल्या, ज्यात वडील आपल्या मुलांचे आभार मानत आहेत. यात एक नाव आहे ते बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याचे, ज्याने आपल्या मुलीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.
अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने आपली मुलगी निताराला दोन्ही हातांनी उचलून घेतले आहे आणि ती झोपलेली आहे. यासोबत त्याने लिहिले की, मला विश्वास आहे, जेव्हा तुम्ही आपल्या मुलाला आपल्या मांडीवर झोपलेले पाहता तेव्हा तो अनुभव तितकीच शांती देतो जेवढी योगा केल्याने मिळते. सर्वांना “फादर्स डे’च्या शुभेच्छा आणि सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिन शुभेच्छा ‘.
अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास तो दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या “सूर्यवंशी’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 24 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु लॉकडाउनमुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे.