अक्षय, जॉनशी टक्कर टाळण्यासाठी प्रभासची माघार

येत्या स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमारचा मिशन मंगल रिलीज होणार असून याच दिवशी जॉन अब्राहमचा बाटला हाऊस देखील रिलीज होत आहे. या दोन चित्रपटांव्यतिरीक्त सेक्रेड गेम्स या बहुप्रतिक्षित वेब सिरिजचा दुसरा भाग देखील प्रदर्शित होणार असून या बिझी फ्रायडे मध्ये आपल्या चित्रपटाची टक्‍कर टाळण्यासाठी अभिनेता प्रभासने आपल्या “साहो’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचे बोलले जात आहे. आता “साहो’ 15 ऑगस्टऐवजी 30 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट व्यापार विश्‍लेषक तरण आदर्शने “साहो’च्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल झाल्याची माहिती दिली.

बाहुबली आणि बाहुबली 2या चित्रपटांमधील भुमिकांमुळे प्रभास बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये सर्वात जास्त चर्चिला जाऊ लागला होता. त्यामुळे त्याच्या साहो या चित्रपटाच्या ट्रेलर वरुनही या चित्रपटाची उत्सूकता आणखीनच ताणली जात होती. मात्र, आता प्रेक्षकांना थोडी आणखीनच वाट पहावी लागणार आहे.

ऍक्‍शन थ्रिलर असलेला “साहो’ हिंदी, तामिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रभास, श्रद्धासोबतच नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, महेश मांजरेकर आणि मंदिरा बेदी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)