Akshay Kumar | अभिनेता अक्षय कुमारचे सध्या काही चित्रपट सातत्याने फ्लॉप होत आहेत. असे असले तरी त्याच्या एकामागून चित्रपटाची घोषणा केली जात आहे. नुकतेच त्याच्या वाढदिवसानिमित्त ‘भूत बांगला’ चित्रपटाची घोषणा झाली. यानंतर आता अक्षय कुमार तेलगुमध्ये पदार्पण करणार आहे. 9 सप्टेंबर रोजी विष्णू मंच यांनी अक्षयचा ‘कन्नपा’मधील फस्ट लूक पोस्टर शेअर केला होता. यात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
अक्षय कुमारची ‘कनप्पा’मधील पहिली झलक समोर आली आहे. त्या पोस्टरमध्ये अभिनेत्याने भगवान शंकराचा लूक केला आहे. त्याने आपल्या हातावर भगवान शंकराची रुद्राक्ष माळ बांधलेली आहे. या पोस्टरमध्ये लिहिले की, ‘भगवान शंकर जेव्हा सर्व क्षेत्रांवर आपले राज्य करत असतात, तेव्हा भक्तांच्या भक्तीची श्रद्धा अपार असते तेव्हा ते भक्तांच्या श्रध्देचे अनुसरण करतात.’ अक्षयच्या या नव्या चित्रपटावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. Akshay Kumar |
Happy Birthday to the one and only Mr. Akshay Kumar!
Best wishes on your special day! 💫@akshaykumar #HappyBirthdayAkshayKumar pic.twitter.com/y7UZeyD8DE
— Vishnu Manchu (@iVishnuManchu) September 9, 2024
अक्षय कुमारसह या चित्रपटात विष्णू मंचू ,प्रभास, मोहनलाल, प्रभुदेवा आणि शरतकुमार यांसारखे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहे. निर्मात्यांनी कन्नपा या चित्रपटाचा फस्ट लूक मार्च 2024 वर्षी महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी शेअर केला होता. अक्षयचा ‘कन्नपा’ हा चित्रपट तेलगु, तमिळ, आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्षित होणार आहे.
‘कनप्पा’ व्यतिरिक्त, अक्षय त्याच्या ‘भूत बांगला’ या चित्रपटामुळेही चर्चेत आहे, ज्याद्वारे तो आणि प्रियदर्शन 14 वर्षांनंतर एकत्र येत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत प्रदर्शित झालेले अक्षयचे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले. मात्र, नुकत्याच रिलीज झालेल्या ‘स्त्री 2’मधला त्याचा कॅमिओ खूप आवडला होता. पण नुकताच प्रदर्शित झालेला त्याचा ‘खेल खेल में’ चित्रपट फारसा चालला नाही. त्यानंतर आता त्यांच्या आगामी दोन्ही चित्रपटांकडून चाहत्यांना फार अपेक्षा आहेत.
हेही वाचा: