-->

अक्षय कुमारच्या “राम सेतू’चे अयोध्येत होणार शूटिंग

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अक्षय कुमारने त्याच्या “राम सेतू’ या आगामी सिनेमाची घोषणा केली. “राम सेतू’चे पोस्टर देखील अक्षयने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. त्यामध्ये अक्षय कुमारच्या पाठीमागे कोदंडधारी प्रभू श्रीरामाचे चित्रही बघायला मिळते आहे. हे चित्र अयोध्येतील राममंदिराच्या आंदोलनाच्या काळात हजारोवेळा लोकांनी बघितलेले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या पोस्टरमध्ये अक्षय कुमारने गळ्याभोवती भगवा रुमाल गुंडाळलेला दिसतो आहे. “या दिवाळीच्या मुहूर्तावर युगायुगांपर्यंत देशाला चेतना देणाऱ्या भगवान रामाची स्मृती जतन करण्यासाठी “राम सेतू’ बनवत आहोत. 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

दरम्यान या चित्रपटाचं चित्रीकरण अयोध्यामध्ये केलं जावं अशी इच्छा अक्षयनं व्यक्त केली आहे. यासाठी नुकतीच त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती.  अक्षयनं योगींची भेट घेतली अन् आपल्या आगामी चित्रपटाबाबत माहिती दिली. या दोघांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 नव्या पिढीला रामाशी जोडण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.’ असे अक्षयने या पोस्टरबरोबरच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. अक्षय कुमारच्या “राम सेतू’चे दिग्दर्शन अभिषेक वर्मा करत आहेत. 

अभिषेक वर्माने यापूर्वी अक्षय कुमारच्या “मिशन मंगल’चे डायरेक्‍शन केले होते. “राम सेतू’च्या निर्मितीची जबाबदारी अरुणा भाटिया आणि विक्रम मल्होत्रा यांनी उचलली आहे. तर डॉ. चंद्रकांत द्विवेदी यांच्यावर “राम सेतू’च्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अद्याप “राम सेतू’मधील अन्य कलाकार आणि अन्य तपशील समजू शकलेला नाही. मात्र लवकरच तो देखील समजेल. अशी आशा करूयात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.