बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार १६ व्या शतकातील एका महाराजाच्या भूमिकेत दिसणार आहे. हाऊसफुल-४ सिनेमात अक्षयचा हा नवीन अंदाजासह दोन कालखंड पाहायला मिळणार आहेत. त्यातील एक सध्याचा काळ आणि दुसरा १६ व्या शतकातील असे दोन कालखंड असणार आहे.
तर दुसरीकडे रितेश देशमुख आणि बॉबी देओल अक्षयच्या दरबारातील सरदाराच्या भूमिकेत पाहायला मिळतील. कृति खरबंदा, क्रिती सेनॉन व पूजा हेगडे हे राजकुमारीच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय चंकी पांडे वास्को द गामाच्या भाच्याची भूमिका साकारताना दिसेल.