‘अक्षय कुमार’च्या साहसी प्रवासाने टेलिव्हिजन विश्वात रचला नवीन रेकॉर्ड

मुंबई – बॉलीवूडमधील “खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार ‘इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’मध्ये खतरनाक खेळ खेळताना झळकला. नुकतंच ‘इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’चा एक एपिसोड प्रसारित करण्यात आला होता.

डिजिटल आणि टेलिव्हिजन माध्यमातून हा एपिसोड टेलिकास्ट करण्यात आला आणि बघता बघता या एपिसोडने टेलिव्हिजन विश्वात एक रेकॉर्ड रचला आहे. “इंटू द वाइल्ड’चा हा एपिसोड 11 सप्टेंबर रोजी डिस्कवरी चॅनलवर प्रसारित करण्यात आला होता.

डिस्कव्हरी नेटवर्क चॅनलवर 1.1 कोटी लोकांनी “इंटू द वाइल्ड’चा हा एपिसोड पाहिला होता. तर डिस्कव्हरी नेटवर्क चॅनलच्या ओरिजनल आणि रिपीट्स भागांसह पहिल्या आठवड्यामध्ये 2.6 कोटी लोकांनी एपिसोड पाहिला आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या “इंटू द वाइल्ड’ एपिसोडमुळे भारतामध्ये Infotainment क्षेत्रातील सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या शो च्या यादीमध्ये दुसर्‍या क्रमांकाचा एपिसोड ठरला आहे.

‘इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’मध्ये हे  दोन कलाकार जंगलात कुठेतरी फिरत असतात, तर कधी दोरखंडावर लटकलेले दिसतात. एवढेच नव्हे तर हे अक्षय आणि बेयर ग्रिल्स हे दोघेजण जंगलात चहा पिताना दिसत आहे. परंतु आश्‍चर्याची बाब म्हणजे हा चहा हातीच्या दुधापासून बनविलेला असतो. या एपिसोड मध्ये अक्षय कुमारसोबत बेयर ग्रिल्सचाही अंदाज खूपच जबरदस्त असल्याचे दिसून येते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.