कॅनडियन असल्यामुळे अक्षय कुमारकडून राष्ट्रीय पुरस्कार परत घेणार?

अभिनेता अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी आपल्या नागरिकत्वाबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपले मत मांडले होते. त्याच्या या स्पष्टीकरणा नंतर अक्षय कुमार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी पात्र आहे की नाही, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अक्षयकडून राष्ट्रीय पुरस्कार परत घ्यावा का? असा सवाल सध्या काही नेटिझन्स विचारत आहेत.

2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रुस्तम’ चित्रपटासाठी अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. अक्षयला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मात्र हा पुरस्कार काढून घेण्याची मागणी काही जणांनी केली आहे.

‘माझ्या नागरिकत्वाबाबत एवढी रुची का दाखवली जात आहे. त्यावरुन विनाकारण नकारात्मक संदेश का फिरवले जात आहेत. मी माझ्या कॅनडाच्या नागरिकत्वाबाबत कधीही लपवले नाही. तसेच माझ्याजवळ कॅनडाचा पासपोर्टही आहे. तसेच, हेही सत्य आहे की, मी गेल्या 7 वर्षात एकदाही कॅनडाला गेलो नाही. मी भारतात काम करतो आणि भारतातच टॅक्स भरतो’, असं अक्षय कुमार म्हणाला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.