मुंबई – गेल्या काही वर्षांपासून सेलिब्रिटीज पर्यावरण संवर्धनाच्या कामात सक्रिय झाले आहेत. दिया मिर्झा, अजय देवगण, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासह अक्षयकुमार देखील या कामामध्ये सक्रिय आहे. त्याच्या या कामाची दखल घेऊन गोल्डन ग्लोब ओनर्स फाउंडेशनने अन्य काही सेलिब्रिटीजच्या बरोबर अक्षयचा सन्मान करण्याचे ठरवले आहे. स्वच्छतेबाबत जनजागृतीचे काम अक्षय करत असतो.
या कामाबद्दल त्याला आणि हॉलीवूडचा स्टार लिओनार्डो डिकॅप्रियो यांना सन्मानित केले जाणार आहे. अक्षयला यापूर्वी अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले केले आहे. “लक्ष्मी’ मध्ये हटके अंदाजात दिसलेल्या अक्षयला आता “सूर्यवंशी’ आणि “बेलबॉटम’ मध्ये प्रेक्षक बघणार आहेत. मात्र हे सिनेमे रिलीज व्हायला थोडा उशीर होणार आहे.