विमानतळावर स्पॉट झाला खिलाडी कुमार ! स्टाइलपेक्षा चर्चेत आली 35 हजारांची एलईडी बॅग.. VIDEO

मुंबई – बॉलिवूड खिलाडी कुमार नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. यादरम्यान लोकांच्या नजरा अभिनेत्याच्या एलईडी बॅगवर पडल्या. अक्षय कुमार ही बॅग पाठीवर घेऊन जात होता. या बॅगवर असलेल्या एलईडी डोळ्यांच्या शेपमुळे ही बॅग सर्वांनाच आकर्षित करत होती. अक्षय कुमारचा या बॅगसोबतचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय यामुळे आता या हटके बॅगेच्या किमतीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
अक्षय कुमार मुंबई विमानतळावर आपल्या हटके अंदाजात दिसला. यावेळी अक्षयने आपल्या स्टाईलप्रमाणे उजव्या बाजूच्या पायाची पॅंट फोल्ड केलेली दिसली. विमानतळावरून बाहेर येताच त्याने मीडियासाठी पोज दिली आणि तो निघण्यासाठी वळला. इतक्यात त्याच्या पाठीवर असलेल्या एका एलईडी बॅगने सर्वांचे लक्ष वेधले.
अक्षय मागे वळताच त्याची उत्तम दर्जाची बॅगही कॅमेऱ्यात कैद झाली. या बॅगेला लाल रंगाचे एलईडी डोळ्यांसारखा शेप देखील होता. अशात आता या बॅगची किंमतही चर्चेत आली आहे. अक्षयने कॅरी केलेली हे बॅगेच टॉप मॉडेल असून याची किंमत 35 हजार असल्याचे समजते. अशा प्रकारच्या बॅगचे मॉडेल नऊ हजारांपासून सुरु होत असल्याचे देखील काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
View this post on Instagram
या बॅकपॅकसोबतचा अक्षय कुमारचा व्हिडिओ व्हायरल होताच यूजर्सनी यावर कमेंट्स करायला सुरुवात केली. अक्षय कुमारने अलीकडेच त्याच्या ‘ओह माय गॉड 2’ चित्रपटाचे शूटिंग शेड्यूल पूर्ण केले आहे. यापूर्वी त्याचा ‘राम सेतू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.




