मुंबई – अभिनेता अक्षय कुमार एका वर्षी तब्बल पाच सिनेमे करतो. विशेष म्हणजे हे सर्व सिनेमे रिलीजही होतात. गेल्या तीन वर्षांपासून अक्षयचे शेड्युल खूपच पॅक असलयाचे दिसून आले. सध्या अक्षयचा कटपुतली प्रदर्शित झाल्यानंतर अक्षयच्या आगामी ५ चित्रपटांतील वेगवेगळ्या लुक्सची जोरदार चर्चा आहे.
सेल्फी
सेल्फी हा चित्रपट अक्षय कुमारच्या वेटिंग लिस्टमधील सर्वात चांगल्या चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एका सामान्य व्यक्तीप्रमाणे लाइट शेव्ह लूकमध्ये डॅशिंग स्टाईलमध्ये दिसणार आहे.
कॅप्सूल गिल
‘कॅप्सूल गिल’ चित्रपटात अक्षय कुमार पंजाबी लूकमध्ये दिसणार आहे. कोल माईन्स रेस्क्यूवर आधारित या चित्रपटाची कथा खाण अभियंता जसवंत सिंग गिल यांच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार गिलची भूमिका साकारताना दिसणार आहे.
राम सेतू
रामसेतू हा अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात अक्षय कुमार पुरातत्वशास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये अक्षय चष्मा घातलेल्या उंच लोकांसोबत दिसत होता. राम सेतू हा चित्रपट 24 ऑक्टोबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार असल्याची देखील माहिती समोर आली होती.
सुरराई पोट्टू
अक्षय कुमारचा हा आगामी चित्रपट अभिनेता सूर्या शिवकुमारच्या 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या सूरराई पोट्टूचा रिमेक आहे. हेच या चित्रपटाचे नाव आहे. पुढील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अक्षय एअरफोर्स कॅप्टनच्या लूकमध्ये दिसणार आहे.
OMG 2
अक्षय कुमारने 2012 मध्ये आलेल्या OMG अर्थात Oh My God या चित्रपटात भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचा दुसरा भागही बनवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार भगवान शंकराच्या भूमिकेत दिसणार आहे.