बॉलीवूडमधील खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार याच्या कॅनडा नागरिकत्वावरून सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगत आहे. त्यात अक्षय कुमारने दिलेल्या उत्तरावर एका सोशल मीडिया यूजरने अक्षयची पोलखोल केली आहे. अक्षय कुमारला खोटे ठरवत त्याने काही ट्वीट केले आहे. त्यावरून सोशल मीडियावर अक्षयला ट्रोल करण्यात येत आहे.
अक्षय कुमारच्या नागरिकत्वावरून वाद सुरू असून त्यावर अक्षयने एक खुलासा देत ट्वीट केले होते. ज्यात त्याने लिहिले होते की, मी 7 वर्षांपासून कॅनडाला गेलेलो नाही. यावर एका सोशल मीडिया यूजरने अक्षयवर खोटी माहिती दिल्याचे ट्वीट केले. ज्यात एक ट्वीट गायक मीका याचे असून ते 9 मार्च 2014मधील आहे. मीकाने ट्वीट केले होते की, गुडमॉर्निंग! अक्षय कुमार, राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी, राहुल खन्ना तुमची शानदार पार्टी झाली. तर दुस-या स्क्रीनशॉटमध्ये अक्षय कुमार टोरांटोच्या एका हॉटेलमध्ये टीना विरमानीच्या कार्यक्रमात आणि एका लग्नसोहळ्याला उपस्थित असल्याचे दिसतो.
दरम्यान, देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीत त्याने मतदान न केल्याने त्याच्या नागरिकत्वावरून नवीन वाद निर्माण झाला आहे.