Akshay Kumar | अभिनेता अक्षय कुमारचे मागील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात अपयशी ठरले. अलीकडेच अक्षय कुमार ‘स्त्री 2’ या चित्रपटात कॅमिओ करताना दिसले. अक्षय कुमार या चित्रपटात पाहुणा कलाकाराची भूमिका केली असली तरी त्याच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
नुकतेच अक्षय कुमारने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर कला होता. हे अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाचं पोस्टर असल्याचं म्हटलं जात आहे. या मोशन पोस्टरमध्ये एक भितीदायक धातूचा चेहरा आहे, तसेच पार्श्वभूमीत लाल पडदे दिसू शकतात. हा व्हिडिओ शेअर करताना अक्षयने ‘गणपती बाप्पा मोरया आजच्या दिवसापेक्षा भारी क्षण कोणताच असू शकत नाही. याचा खुलासा माझ्या वाढदिवशी होईल,’ असे म्हंटले आहे.
दरम्यान अक्षय कुमारचा वाढदिवस ९ सप्टेंबर रोजी आहे. मात्र अद्याप अक्षयने देखील याबाबत कोणताही खुलासा न केल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. अक्षय कुमार हा प्रियदर्शन यांच्या हॉरर चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती. त्यात अक्षय कुमारने एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ याच चित्रपटाचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. अक्षयने याआधी ‘भूल भुलैया’सारखा चित्रपट केला आहे. जो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता.
या प्रकल्पाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, जसे की हे मोशन पोस्टर त्याच्या पुढील मोठ्या प्रकल्पाचे संकेत आहे का? चित्रपटाचा विषय काय असेल? अक्षयसोबत कोण असेल? यावेळी त्याचे पात्र काय असेल? हा एक हॉरर चित्रपट असेल की अक्षयकडे आणखी काही सरप्राईज आहेत? परंतु याचे उत्तर जाणून घेण्यासाठी चाहत्यांनाही प्रतिक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा:
कियारा अडवाणीची कॉपी करणे अनन्या पांडे पडले, ‘महागात’